नागपुरात हॉटेल मॅनेजरचे रस्त्यावर अश्लील आणि लज्जास्पद कृत्य, पोलिसांनी अटक केली

मंगळवार, 11 मार्च 2025 (18:03 IST)
पुण्यात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यांनतर आता नागपुरात देखील अशीच घटना घडली आहे.नागपुरात वर्धारोड मध्यवर्ती कारागृहाजवळील एका जॉगिंग ट्रॅकच्या फुटपाथवर असलेल्या बाकावर काही तरुणी रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बसल्या होत्या.
ALSO READ: जालन्यात स्वयंघोषित बाबाला अखेरीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केले होते
तरुणींना बाकावर बसलेले पाहून आरोपी आपल्या गाडीने तिथे आला गाडीतून उतरल्यावर फोनवर बोलू लागला आणि मुलींजवळ फिरत असताना त्याने अश्लील कृत्ये करण्यास सुरु केले. मुलींनी त्याला असे करण्यापासून रोखल्यावर देखील तो थांबला नाही.
ALSO READ: लाडक्या बहिणींना मोठा धक्का
तिथे बसलेल्या त्या तरुणीने धाडस करत त्याचे व्हिडीओ बनवले आणि व्हिडीओ व्हायरल केले. तिने मैत्रिणीला पोलिसांना फोन करण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ बनवला असल्याचे पाहून तो तिथून गाडीत बसून पसार झाला. व्हिडीओ मध्ये त्याच्या गाडीचा नंबर स्पष्ट दिसला.

 व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नागपूरचे पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करत गाडीच्या क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. 
ALSO READ: महाराष्ट्रात हिंदूंना मटण विक्रीसाठी देणार नवा अधिकार नितेश राणेंनी केली घोषणा
आरोपी मूळचा कर्नाटकचा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो नागपूरमधील एका  हॉटेलमध्ये स्वयंपाकघर पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे.आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त करण्यात आले आहे. या पूर्वी देखील त्याने असे कृत्य केले आहे का पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती