महाड (जि. रायगड) तालुक्यातील वहूर या गावात भर वस्तीत रविवारी मध्य रात्री गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत गोठा जळून खाक झाला, त्याच बरोबर त्या मध्ये बांधलेले शर्यती साठी वापरले जाणारे ४ बैल होरपळून जागीच ठार झाले. या दुर्घटनेमध्ये बैल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाड (जि. रायगड) तालुक्यातील वहूर गावातील झटाम मोहल्ल्यात राहणाऱ्या रफीक मोहमद सईद झटाम यांच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्याला रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक आग लागली. याआधी मध्ये संपूर्ण गोठा जळून खाक झाला.आगीची तीव्रता एवढी भयानक होती की गोठ्या मध्ये शर्यती साठी वापरले जाणारे चार बैल बांधलेले होते त्यांचा होडपळून जागीच मृत्यू झाला. या चार बैलांमध्ये शर्यती साठी एकजोडी समुद्र किनारी धावणारी होती तर दुसरी जोडी माती बंदरामध्ये धावणारी होती. मालकांने एक जोडी कर्नाटक मधून खरेदी केली होती तर एक जोडी अलिबाग तालुक्यातून. या चार बैलांची किंमत मालकाच्या सांगण्या वरून सुमारे १० लाख रुपये इतकी होती. आगी मध्ये बैल गोठा आणि इतर झालेले नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे १४ लाख रुपये यांचे नुकसान झाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor