राम मंदिराच्या दरवाजासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सागवान लाकूड पाठवले जात आहे

सोमवार, 27 मार्च 2023 (21:52 IST)
अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या दरवाजासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सागवान लाकूड पाठवले जात आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मंदिराचा महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा आणि उर्वरित दरवाजांसाठी लाकूड चंद्रपूरच्या जंगलातून पाठवण्यात येणार आहे. यासाठी २९ मार्च रोजी चंद्रपुरात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
चंद्रपुरात २९ मार्च रोजी मंदिरासाठी लाकडे पाठवण्यासाठी भव्यदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काष्ठपूजनानंतर रथातून मिरवणूक काढून अयोध्येकडे रवाना करण्यात येणार आहे. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने चंद्रपूरचे सर्वोत्तम लाकूड असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे चंद्रपुरच्या लाकडाला राम मंदिरासाठी पसंती देण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती