इक्वेडोर सरकारच्या मंत्री इनेस मंझानो यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की राष्ट्राध्यक्षांवर हल्ल्याचा अहवाल दाखल करण्यात आला आहे. हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की कारवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सध्या पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.