हा व्हिडीओ 9 एप्रिलचा आहे. 9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातीलखासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या दिवशी हॉस्पिटलमधील शिवराजयांनी तोडफोड केली म्हणून मारहाण केली असल्याचा खुलासा कदीम पोलीस स्टेशनद्वारे करण्यात आला आहे.