मिळालेल्या माहितीनुसार भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून असे सांगण्यात येत आहे की, फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता फक्त आमदारांची मते मागवली जात आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर महायुतीचे नेते आज दुपारी साडेतीन वाजता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईतील आझाद मैदानावर ऐतिहासिक शपथविधी होणार आहे.