पुण्यात ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला 3 किलोमीटरपर्यंत ओढत नेले, 3 जणांना अटक

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (09:37 IST)
Pune News : पिंपरी-चिंचवड, पुणे येथे झालेल्या वादानंतर ऑडी कारच्या चालकाने मोटारसायकलस्वाराला कारच्या बोनेटला लटकवून तीन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत खेचले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
ALSO READ: भाजप आलाय, मराठी बोलू नका मारवाडी बोला, महिलेच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला दिला चोप
मिळालेल्या महतीनुसार रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेनंतर काही वेळातच कार चालक कमलेश पाटील आणि त्याचे दोन साथीदार हेमंत म्हाळसकर  आणि प्रथमेश दराडे यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या वेळी दोघेही कारमध्ये उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित झकेरिया मॅथ्यू हे मोटारसायकलवरून जात असताना बिजलीनगर परिसरात ऑडी कारने दुचाकीला धडक दिली. ऑडी चालक जोरात गाडी चालवत होता. निगडी पोलीस ठाण्याच्या अधिकारींनी सांगितले की, “मोटारसायकलवरून खाली उतरल्यानंतर मॅथ्यू कारमधील लोकांकडे गेला आणि त्यांनी असे का केले असे विचारले. यानंतर तिन्ही आरोपींनी मॅथ्यू आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर हल्लाही केला. यानंतर कार चालकाने मॅथ्यूला धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो बोनेटवर पडला. कार चालकाने त्याला  कारच्या बोनेटला लटकवून तीन किलोमीटरहून अधिक लांब ओढले. यानंतर ते पळून गेले. चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती