पीएमपीएल च्या बस ने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली त्यात नितीन बापूराव शिंदे या व्यक्तीचा जागीच मृत्यू या प्रकरणी मयत नितीन यांच्या मित्राने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ते दोघे महाळुंगे येथे कामावर जात असताना चाकण मार्गावरून जात असताना भरधाव पीएमपीएल बस ने नितीन शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नितीन शिंदे हे गाडीवरून पडले असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला