काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली आहे. मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. आप आणि एमआयएम वगळता इतर जवळपास सर्व राजकीय पक्ष या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, रिपब्लिकन पक्ष गवई गट, शेकाप पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डमध्ये आणि संपूर्ण भारतात चार महिन्यात भारत जोडो, नफरत छोडो मोहीम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत जोडो यात्रा निघणार असून विविध ठिकाणी फिरून यात्रा मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ संपणार आहे. मुंबईतील ही यात्रा एका दिवसाची असणार आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्थाही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.