एकादशी आणि महाशिवरात्री असल्यामुळे मोठया संख्येने लोक उपवास करतात. तसेच काल एकादशी निमित्त काही नागरिकांनी भगर सेवन केली पण त्यातून त्या नागरिकांना विषबाधा झाली. काहींना रात्री तर काहींना पाहटे उलट्या, मळमळचा त्रास झाला. मोठया संख्येने नागरिक विष बाधित झाले. तसेच विषबाधा झालेल्या नागरिकांना हदगावमधील उपजिल्हा रुग्णालय भर्ती केले तर काहींना खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.