महाशिवरात्रीच्या उपवासात काय खाणे टाळावे?

शुक्रवार, 8 मार्च 2024 (05:06 IST)
Mahashivratri Fasting Rules: महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या पूजेला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भोलेनाथाची पूजा करणे फलदायी मानले जाते. या दिवशी उपवास करुन व्रत पाळले जाते.
 
महाशिवरात्रि व्रत नियम
महाशिवरात्रीला दिवसातून एकदा फळे खावीत. या उपवासात सैंधव मिठाचा वापर करावा.
ज्यांना केवळ फळांवर भागत नसेल ते उपवासात शिंघाड्याचा शिरा, साबुदाणा, फळे आणि बटाटे यांचे सेवन केले जाऊ शकते.
उपवासात गहू, तांदूळ आणि संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला भांग, धतुरा, उसाचा रस, मनुका आणि चंदन अर्पण करावे.
 
महाशिवरात्रीच्या उपवासात या गोष्टी खाऊ नका
उपवास करणारे तसेच व्रत पाळत नसणार्‍यांनी देखील या दिवशी लसूण आणि कांदा खाऊ नये.
महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरे मीठ खाऊ नये.
उपवासाच्या वेळी मांस आणि मंदिराचे सेवन करू नये.
 
महाशिवरात्री व्रताची पूजा पद्धत
एका भांड्यात पाणी किंवा कच्चे दूध, आकड्याचे फुलं, धतुरा आणि अक्षता इत्यादी शिवलिंगाला अर्पण करावे. महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती