या बैठकीसाठी सकाळपासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समन्वय आणि गावोगावातील प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. मात्र या बैठकीपूर्वी अचानक मधमाश्यांनी हल्ला केला.लोकांनी बचावासाठी पळापळ सुरूकेली. मात्र या हल्ल्यात मधमाश्यांनी अनेकांना चावलं. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
या बैठकीत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील मुद्द्यांविषयी माहिती दिली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातील 50 ते 60 तालुका सेवकांना बोलावले होते. तसेच गाव, तालुका, जिल्ह्यस्तरावर नोंदी शोधणारे बांधव, प्रमाणपत्र काढणारे, दस्तऐवज मांडणारे, मराठा समाजासाठी काम करणारे सेवकांना देखील सहभागी करण्यात आले.