संतापजनक : 'टॉय’ आणि ‘अंतर्वस्त्रे’ पाठवून दिला जातोय अभिनेत्रीला त्रास

गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (10:19 IST)
मागील काही दिवसापांसून सिनेसृष्टीत अनेक अजब प्रकार घडताना दिसत आहे. यात एका 28 वर्षीय अभिनेत्रीला एक अज्ञात व्यक्ती चक्क गेली दोन महिने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून त्रास देत आहे. असा धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. अशा विचित्र भेटवस्तु पाठवणा-या इसमाचा शोध पोलिस घेत आहेत.
 
या प्रकारावरुन संबंधित अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे की, ‘एक अज्ञात व्यक्ती गेली 2 महिने तिला विचित्र भेटवस्तू पाठवून त्रास देत आहे.त्या व्यक्तीने आजपर्यंत मला 8 वेळा भेटवस्तू पाठवली आहे.यात अंतर्वस्त्रे आणि काही सेक्स टॉय पाठवण्यात येत आहे.सुरुवातीला एक ते दोन वेळा मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र  सातत्याने अशा घटना घडू लागल्याने मला पोलिसांची मदत घ्यावी लागली असल्याचं त्या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.दरम्यान, त्यांनतर आंबोली पोलीस  या सर्व प्रकारचा तपास करीत आहेत.
 
दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध IPC कलम 509 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनतर अजून महिलेला काही निदर्शनास आलेलं नाही.मात्र या प्रकरणात काही शॉपिंग ऑर्डर दिलेले नंबर हाती लागले आहेत.त्यावरुन पुढील तपास केला जात असल्याचं आंबोली पोलीस ठाण्याच्या अधिका-यानं दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती