मिळालेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्री परिषदेला उपस्थित होते. वेळेवर मदत केल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्विटरवरून आभार मानले.