महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहे. तसेच येत्या कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्लाची पूजा यावेळेस कोण करणार किंवा हा महापूजेचा मान कोणाला मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. कारण असे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री असून हा मान कोणाकडे जाईल असा प्रश्न उपस्थित होत होता.
पण आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. माहिती सामोर आली आहे की, या कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हि महापूजा करतील. या वर्षीचा महापूजेचा सन्मान शिंदेंना मिळणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, राज्य सरकारने या बद्दल मार्गदर्शन मागितले होते. ज्यामध्ये शिंदे यांचे नाव सुचवण्यात आले आहे. आता यावर्षी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूच्या विठूरायाची महापूजा करतील.