आत्महत्या करण्यापूर्वी एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर लिहिले की, "आयुष्यात माझे कोणतेही ध्येय किंवा स्वप्न उरलेले नाहीत. हे जीवन एक ओझे बनले आहे." पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
वृत्तानुसार, शनिवारी सकाळी ही घटना घडली. नाशिकमधील गंगापूर रोडवरील एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून विद्यार्थ्याने उडी मारली. त्याला गंभीर अवस्थेत तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.