महापुराच्या मदतीसाठी लाच मागणारा शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (10:15 IST)
करवीर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायास महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक  करण्यात आली आहे. शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३) असे या शिपायाचे नाव आहे.
 
महापुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल परमिट रुम बिअर बारचे नुकसान झाले होते.
हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंचाच्या सहीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक असते. या दाखल्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीत अर्ज दिला होता. हबरज देण्यासाठी शिपाई शिवाजी चौगले याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने 24 ऑगस्ट 2021 रोजी अर्ज दिला होता.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पंच साक्षीदारांच्या समक्ष आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी चौगुले याची पडताळणी केली असता त्याने लाच मागितल्याचं निष्पन्न झालं.त्यामुळे त्याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश मोरे,हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर,कृष्णात पाटील, रुपेश माने या पथकाने केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती