* दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल, काही खाल्ल्यावर, चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतुसंसर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. दातांमध्ये कोणीतरी टोकदार वस्तू टोचत असल्याची जाणीव होत असेल तर तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.
* संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे दात संवेदनशील बनू शकतात. या समस्येवरचा उपाय शोधणे गरजेचे आहे.