अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की आपला अंतिम काळ श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. अशा वारकरी बांधवांना सुखात राहता यावे; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्यांची इमारत उभारण्यात येईल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाटील म्हणाले, आयुष्याच्या शेवटी आपला अंतिम काळ क्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतीत करावा, अशी अनेक वारकऱ्यांची इच्छा असते. त्यामुळे अशा वारकऱ्यांना आळंदी येथे राहता यावे, यासाठी आळंदीत लकरच लोकसहभागातून 100 खोल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे. आषाढी वारीनंतर भूमिपूजन करुन या इमारतीच्या कामाची सुरुवात होईल.
दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाटय़प्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. या नाटय़ प्रयोगातून आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले जाईल. तसेच नाटय़स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार आहे.