सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आलीये.
ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरला परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केलेय.