भेट महत्त्वाची : शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची घेतली भेट

बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:10 IST)
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती.या  भेटीमध्ये शाहू महाराज छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. एक तासाहून अधिक काळ शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये चर्चा झाली.  
 
लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल असे शरद पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच शाहू महाराजांच्या बद्दल स्पष्ट भूमिका मांडली. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
 
शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत. मी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती