मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन

सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (11:53 IST)
भाजप मुबईकरांना रामललाचं  मोफत दर्शन घडवणार असून भाजपने मिशन अयोध्या सुरु केलं आहे. रात्री 9 वाजता अयोध्यासाठी पहिली विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्लॅट  क्रमांक 18 वरून रवाना होणार.
आज या विशेष रेल्वे ने उत्तर मुंबईतील भाविकांचा पहिला संघ अयोध्याला जाणार आहे. या विशेष रेल्वेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव साहेब दानवे पाटील, मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आणि खासदार गोपाळ शेट्टी या विशेष रेल्वेला हिरवा झेन्डा दाखवणार आहे. 
 
 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मिशन अयोध्या 24 मार्च पर्यंत सुरु असणार.या अयोध्येत 20 हजार लोकांना सामावण्याची क्षमता असलेले टेंट सिटी बनवले आहे. रामल्लाच दर्शन दररोज विविध राज्यातील 20 हजार अधिक भाविक घेऊ शकतील. 
 
मिशन अयोध्याने भाविकांना मोफत रामल्लाचं दर्शन घेता येणार आहे.एक लोकसभा  
मतदारसंघातून सुमारे 40-50 हजार लोकांना  रामल्लाच दर्शन घेता येणार आहे. असं नियोजन भाजप कडून करण्यात आलं आहे.आज या मिशन मधून पहिली रेल्वे अयोध्याला रवाना होणार आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती