अजित पवार यांनी असे दिले उत्तर “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (21:07 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथील वन उद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि उद्घाटनं केली. यानंतर केलेल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर अजित पवार पत्रकार परिषद संपवून उठले. त्यानंतर खासदार संभाजी राजेंबद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता… “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात” असं उत्तर देत त्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर बोलणं टाळलं.
 
तळजाई परिसरात फेरफटका मारत असताना त्यांनी अनेक गोष्टी बारकाईने पाहिल्या असल्याचं समजतंय. दुर्दैवाने काही लोक राजकीय फायद्यासाठी झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देतात देत असल्याचं अनेकदा दिसलं आहे. गरिबांना हक्काची घर मिळाली पाहिजे,पण झोपडपट्टी वाढायला नको त्यासाठी एसआरए सारखे प्रोजेक्ट राबतोय असंही त्यांनी सांगितलं. लोक कोठेही कचरा टाकतात, हे योग्य नाही, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, तळजाईवर भटक्या कुत्र्याचा त्रास वाढल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या आहेत. इथं पूर्वी ससे खुप होते, पण कुत्र्यांमुळे ससे राहिले नाहीत. तसेच परिसरातले मोर कमी झालेत, काही लोकांनी डुकरी इथं परिसरात आणून सोडलीत. इथं आता कुत्री आणायला बंदी केली आहे. त्यामुळे यापुढे इथल्या परिसरात कुत्री दिसणार नाहीत. आधीच्या सरकार मधल्या वनमंत्र्यांनी इथं बाभळीची झाड लावली, जी लावायला नको होती, आता ती झाड काढून दुसरी झाड लावणार असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले. तसेच इथं देशी आणि स्थानिक झाड लावली असं आवाहन देखील केलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती