विधानसभेची तयारी शिवसेना युवराजांची आता महाराष्ट्रात जन आशिर्वाद यात्रा

बुधवार, 10 जुलै 2019 (16:28 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिवसेनेचा व युतीचा प्रचार करणार आहेत. जून काढणार आहेत. आदित्य ठाकरे शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करत आहेत. आदित्य हे अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून सुरुवात करतील. येत्या  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. 
 
तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आगोदर राज्यात पक्षाची वातावरण निर्मिती करुन केलेल्पाया पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे.
 
मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व राज्यात रुजवण्यासाठी देखील शिवसेना या यात्रेकडे पाहत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती