वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० फॉर्म्युला नियमबाह्य

बुधवार, 10 जुलै 2019 (09:34 IST)
वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० फॉर्म्युला नियमबाह्य आहे. तो तातडीने रद्द करावा, यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी लातूर येथे विद्यार्थी आणि पालकांसह संभाजी सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला. अशा मोर्चा मोर्चांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. एक नीट एक देश हानियम सरकारनेच घाल्य़ु दिलेला असताना ७०, ३० चा निकष अन्यायकारक आहे असे मोर्चेकर्‍यांचे म्हणणे होते. हा मोर्चा लोकमान्य टिळक चौकात आल्यानंतर यात शेकडो विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले. हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती