संजय राऊत यांचा राज ठाकरेंचे नाव न घेता टोमणा

मंगळवार, 9 जुलै 2019 (16:57 IST)
लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर यात बिघडलं कुठे? अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी सोनिया गांधींची जी भेट घेतली त्यावर टोला लगावला आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. याच भेटीवरुन संजया राऊत यांना विचारण्‍यात आले तेव्‍हा त्‍यांचा व्‍यक्‍तीगत प्रश्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणार आहेत, यावरुन त्‍यांना विचारण्‍यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती