झोमॅटो इंडियाच्या ट्विटने केला ट्रेन्ड तयार

बुधवार, 10 जुलै 2019 (09:24 IST)
सध्या झोमॅटो इंडियाने केले ट्विट प्रचंड चर्चेत आहे. झोमॅटो इंडियाच्या या ट्विटने ट्विटरवर एक ट्रेन्ड तयार केला आहे. झोमॅटोने चक्क ‘कधीतरी घरचंही जेवण खायला हवं,’ अशा आशयाचं हिंदी भाषेतून ट्विट केलं आहे. झोमॅटोकडून आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात ट्विट केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत या ट्विटची मजाही घेतली आहे. झोमॅटोचे हे ट्विट इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही भलतेच भावले असून त्यांनी देखील झोमॅटो इंडियाच्या ट्विटची कॉपी करत आपल्या मूळ स्वभाविरोधात ट्विट केले आहे. 
 
यामध्ये युट्यूब इंडिया, इक्झिगो, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आयएन, मोबोविक या कंपन्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर झोमॅटोच्या ट्विटची कॉपी केली आहे. यानंतर ट्विटला उत्तर देताना झोमॅटोने पुन्हा एकदा ट्विट केलंअसून यात ‘कधी कधी स्वतः चांगल्या ट्विटचा विचार करायला हवा’ असे म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती