उत्तरे ऐकून राज पुत्राने टेकले डोके

मंगळवार, 9 जुलै 2019 (16:30 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरानंतर त्यांनी अक्षरश: त्यांच्यासमोर डोके टेकल्याचे पाहालया मिळाले. त्यानंतर मनसेच्यावतीने त्यांना एक मागण्याचे निवेदन देण्यात आले.
 
या बैठकीत अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या महाव्यस्थापकांसमोर समस्यांचा मांडल्या. त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महाव्यवस्थपकांसमोर मांडला. तसेच रेल्वेमध्ये महिला सुरक्षित नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावे आणि सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच रेल्वेच्या मेगाब्लॉकवर आणि पावसाळ्यात रेल्वेच्या रखडपट्टीवर उपाय काढावे, रेल्वेच्या संख्यांमध्ये वाढ करावी, असेही त्यांनी नमूद केले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती