गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर पुरात वाहून गेल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावाजवळच्या नाल्याला आलेल्या पुरात ट्रक वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे.नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला
नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय.
नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत जोरदार सुरवात केली आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे जोरदार पावसामुळे देव नदी ओसंडून वाहत आहे.