भारतीय हवामान विभागानुसार, सध्या ईशान्य राजस्थान आणि परिसरावर 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती बनली आहे. मान्सूनचा आस ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे.
आज सोमवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसाची उघडीप असणार. अशी शक्यता आहे.