पुणे सह या 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अर्लट जारी

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (16:07 IST)
सध्या राज्यात पावसाचा वेग कमी झाला आहे. आज हवामान खात्यानं पुणे आणि राज्यातील 5 जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला  आहे. 
हवामान खात्यानं पुणे, कोकणातील रायगड, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदी, तलाव, नाले, ओसंडून वाहत आहे. धरणे देखील भरली आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 

पुण्यात जुलै महिन्यात पाणी भरपूर पडल्यामुळे कळमोडी, टेमघर, आंद्रा भाटघर धरणे भरली आहे. चासकमान, डिंभे, भामा आसखेड, मुळशी, वाडीवाले, पानशेत, वरसगाव नीरा देवघर, गुंजवणी आणि वीर धरणे 90 टक्केहून अधिक भरली आहे. तर उजनी धरण 104 टक्के भरले आहे.
 
हवामान खात्यानं आज शुक्रवार रोजी घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी विसर्ग करणार नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
 Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती