मिळालेल्या हितीनुसार बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी सप्टेंबर २०२० ते जुलै २०२४ दरम्यान लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. पीडितांनी त्यांच्या नोकऱ्यांबद्दल अपडेट्स मागितले तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, पीडितांना दिलेली कागदपत्रेही नंतर बनावट असल्याचे आढळून आले. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बदलापूर, मुंबई आणि झारखंड येथील रहिवासी असलेल्या तिघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला.