पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपली वैवाहिक स्थिती लपवून मुली आणि महिलांना फसवत असे. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो त्यांच्याशी अवैध संबंध ठेवायचा. यावेळी तो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवायचा आणि नंतर ब्लॅकमेल करायचा. एवढेच नाही तर आरोपी पत्नीवर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असे. पीडितेला तिच्या पतीच्या कृत्याबद्दल संशय आल्यावर तिने तिच्या एका नातेवाईकाच्या मदतीने त्याचा फोन क्लोन केला आणि त्याचे व्हॉट्सॲप हॅक केले. तिने त्याचे व्हॉट्सॲप चेक केले तेव्हा पायाखालची जमीनच सरकली. आरोपीचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे तिला समजले. यामध्ये अनेक अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. आता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.