ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच नाशिक, जळगाव, घाट परिसर आणि नगर जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 1 आणि 2 एप्रिल रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर-सातारा, सांगलीत यलो अलर्ट
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्टसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवार आणि 3 एप्रिलसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यासाठी 2 आणि 3 एप्रिल, नांदेड जिल्ह्यासाठी 4 एप्रिल, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, अकोला-अमरावती जिल्ह्यासाठी 2 ते 4 एप्रिल, पुढील दोन दिवस अकोला-अमरावती आणि 2 ते 4 एप्रिलला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी 1 आणि 2 एप्रिलला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडकोट, चंदगड, चंदगडमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.