Sangli News: महाराष्ट्रातील सांगलीत एका कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केल्याची बातमी समोर आली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या तासगाव येथून जुन्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, 5 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील वाफळे गावात ही घटना घडली आहे. वायफळे गावातील बसस्थानक चौक ते दलित वसाहत दरम्यान काल सायंकाळी हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, रोहित संजय फाळके या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.