ऑस्ट्रेलियाने हा सामना 114 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव केला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी, म्हणजे 10 ऑगस्ट रोजी मॅके येथे खेळला जाईल. भारतीय महिला संघाने आधीच ही मालिका गमावली आहे.