पोलिसांनी अत्याचार थांबवावेत, असे देखील ते म्हणाले. संविधानाचा अवमान करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा आदर करणाऱ्या लाखो जनतेचा घोर अपमान आहे असे देखील ते म्हणाले. तसेच परभणी जळत असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची विभागणी करण्यात व्यस्त होते. संविधानाचा आदर न करणारे लोक सत्तेत आहे, त्यामुळे अशा घटना घडत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी डॉ.आंबेडकर समर्थकांवर अमानुष हिंसाचार केल्याचे त्यांनी सांगितले.