पंढरपुरात हरवलेला कुत्रा प्रवास करून कर्नाटकात घरी पोहचला, फुलांनी स्वागत करीत लोकांनी केला भंडारा

बुधवार, 31 जुलै 2024 (12:13 IST)
कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील निपानी तालुक्यात यमगरनी गावामध्ये सध्या एक बातमी समोर आली आहे. स्थानीय नागरिकांनी काळ्या कुत्र्याला फुल आणि हार घालून फिरवले. तसेच त्याच्या सुखरुप येण्यामुळे नागरिकांनी भांडार केला. गावातील नागरिकांसाठी हरवलेले कुत्रे 250 किलोमीटर चालत येऊन गावात परत येणे हा एक चमत्कारच होता .
 
तसेच प्रेमपूर्वक ‘महाराज' नावाने ओळखला जाणारा कुत्रा दक्षिण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये हरवले होते, पण हे कुत्रे 250 किलोमीटर प्रवास करून उत्तर कर्नाटकच्या बेळगावातील यमनगरी गावामध्ये परतले. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जेव्हा ‘महाराज' चे मालक पंढरपूर यात्रेसाठी निघाले होते. तेव्हा कुत्रे देखील त्यांच्या सोबत निघाले होते.
 
तसेच कुत्र्याच्या मालकाने सांगितले विठ्ठलाच्या दर्शनानंतर त्यांना कुत्रे कुठेच दिसले नाही. त्यांनी शोध घेतला पण त्यांना ते कुत्रे कुठेच आढळले नाही. त्यानंतर मी हताश होऊन घरी परतलो. 
 
तसेच मालकाने सांगितले की, कुत्रे घरी परत आले व ते चांगल्या अवस्थेत होते. घरापासून कमीतकमी 250 किलोमीटर दूर हरवलेले कुत्रे घरी परत येणे हा एक चमत्कारच आहे. आम्हाला वाटते की पांडुरंगाने त्याला वाट दाखवली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती