पाकिस्तान आता स्वतः दहशतवादाच्या जाळ्यात अडकले आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. आता पाकिस्तानचे सैन्य आणि पोलिसही सुरक्षित नाहीत. ही बातमी उत्तर वझिरिस्तानची आहे. येथे लष्करावर आत्मघातकी हल्ल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 13 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला आहे. एक दहशतवादी बॉम्बने भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्यात घुसला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात 13 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही बातमी स्थानिक सरकारी अधिकाऱ्याकडून आली आहे.