पंढरपूर : सीएम एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, भक्तांना अवघ्या 2 तासांत विठ्ठलाचे घडणार दर्शन

बुधवार, 17 जुलै 2024 (10:50 IST)
विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते झाली. तसेच शिंदे आणि त्यांच्या पत्नीचा मंदिराच्या गाभाऱ्यात महापूजेनंतर सत्कार केला गेला. तरएकनाथ शिंदेंनी या समारंभ कार्येक्रम आज मोठी घोषणा पंढरपूर मधील विठ्ठलाच्या मंदिरासाठी केली आहे. 
 
आता पंढरपुरात विठ्लाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन व्यस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र सरकारकडून 103 कोटींचा निधी या दर्शन व्यवस्थेसाठी दिला जाणार आहे. मोठी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. तसेच विठ्ठलाचे दर्शन अवघ्या दोन तासांत या टोकन व्यवस्थेमुळे भाविकांना घेता येईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती