जळगावच्या व्यावसायिक महिलेची तब्बल ९४ लाख रु. फसवणूक

सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:16 IST)
जळगावातील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाखाली तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयाचा फसवणूक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत असे की, शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या महिला व्यावसायिक योगीता उमेश मालवी (वय-३८) ह्या खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात.व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली.कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले.प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले.
 
अविनाश अर्जून कडमकर,प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर,कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद,अर्जून माधवराव सर्व रा.देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले.दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती