नाशिक रोड परिसरात सोमवारी उघड्या विजेच्या पॅनलच्या संपर्कात आल्याने पाच वर्षाच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला. आफ्फान नईम खान असे या मयत मुलाचे नाव आहे. जोद्दीन डेपो जवळ हा चिमुकला खेळत असताना उघड्या विद्युत पॅनलच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का लागला. पोलिसांनी माहिती मिळतातच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्फान आई सोबत डेपो जवळ आला होता. त्याची आई गोणी बनवण्यात व्यस्त होती. तो खेळत असताना अचानक त्याचा हात उघड्या विद्युत पॅनलला लागला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का लागला त्याला तातडीनं स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आगार व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पुढे अशा घटना होऊ नये या साठी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.