याबाबत पोलिसांनी सांगितले की, श्रीमती कल्याणी संतोष मोरे (रा. लक्ष्मी नगर, पिंपळपट्टी रोड, मोरे मळा, जेलरोड) या आपल्या चार मुलामुलीसह राहतात. त्यांचा मुलगा प्रथमेश मोरे व शेजारी राहणारा निखिल बोराडे हे मित्र आहेत. त्यांचे यामुळे एकमेकांच्या घरी जाणेयेणे आहे.
तीन आठवड्या पूर्वी या मित्रांमध्ये काही तरी कारणावरून भांडण झाले होते, तेव्हा निखिलने प्रथमेशच्या घरात घुसून तोडफोड केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलिसात तक्रार केली होती. याचा राग निखिल च्या मनात होता. प्रथमेश मुंबईला कामानिमित्त गेला असता निखिलने रात्रीच्या सुमारास त्यांच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून दरवाज्याला व बेडरूमच्या उघड्या खिडकीतून पेट्रोल टाकून आग लावली.