या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून -गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस शुक्रवारी दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली. पुढे स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक, मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून आगीचे लोट येऊ लागले.शेजारील बोगी मधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला.
त्यानंतर गाडीच्या गार्डला समाजल्या नंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली. गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. दरम्यान तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले. मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्याना घटनास्थळी पोहचण्यात कसरत करावी लागली. तो पर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला.
या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.या घटनेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.