रविवारी दि.१४ रोजी जुने नाशिकमधून मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय, नाशिक रोड आणि अंबड परिसरातही जल्लोषात मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने शुक्रवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी करडी नजर असणार आहे. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक मार्गासंदर्भात वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नाशिक रोड आणि अंबड परिसरातील पाथर्डी फाटा या तीनही ठिकाणी मिरवणूक मार्ग दुपारी १२ वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त बच्छाव यांनी केले आहे. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरीही पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना आदेश लागू नाही, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
मुख्य मिरवणूक : भद्रकाली राजवाडा, वाकडी बारव, महात्मा फुले मार्केट-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-नेहरू गार्डनमार्गे शालिमार-शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.पर्यायी रस्ता : राजवाडा चौकातून सारडा सर्कल, द्वारकामार्गे इतरत्र.
– दिंडोरी नाका-पेठ फाटा-रामवाडी पूल-अशोकस्तंभ-मेहेरमार्गे सीबीएस व इतरत्र
सोहळा : पाथर्डी फाटा सिग्नल येथील डॉ. आंबेडकर पुतळा
नाशिक-पुणे वाहतूक दत्त मंदिर सिग्नलवरुन उड्डाणपूलामार्गे इतरत्र. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील बसेस सुभाष रोडमार्गे जातील. तर सीबीएसकडे जाणार्या बसेस नाशिकरोड न्यायालयासमोरुन मार्गस्थ होतील.