५ महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू

मंगळवार, 15 जून 2021 (15:47 IST)
शिर्डीत अवघ्या ५ महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. या चिमुकलीला अगोदर करोना झाला होता. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत रहिवासी आहे. त्यांना दोन मुली आहे. परिस्थिती सामान्यच आहे. लहान मुलगी ५ महिन्यांची आहे. मे महिन्यात या मुलीला जुलाब, उलट्या असा त्रास होत होता. तिला कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाशिक येथे हलविण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात आले. कोरोना चाचणी करण्यात आली.
 
ती निगेटिव्ह आली होती. तिचे रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहित कोरोना होऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. तरीही तिला फरक पडत नव्हता. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला. लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती