मुंबईकरांसाठीं या दुसऱ्या लाटे नंतर मोठी दिलासादायक बातमी येत आहे.त्या मुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणारी धारावी पहिल्यांदाच शुन्यावर आली आहे.गेल्या 24 तासात या भागात कोरोनाचे एक ही रुग्ण आढळले नाही. ही माहिती बीएमसी म्हणजे मुंबई महानगर पालिके ने दिली आहे.त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत काल,रविवारी 700 कोरोनाबाधितांची नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 19 रुग्ण मृत्यूमुखी झाले होते. तर 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यानुसार रविवारी मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 16 हजार 579९वर पोहोचली आहे. यापैकी 15 हजार 183 रुग्ण मृत्यूमुखी झाले असून 6 लाख 83 हजार 382 कोरोनामुक्त झाले आहेत.