१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पोलीस दलाच्या सेवेतील शौर्यासाठी आणि उल्लेखनीय कामगिरी साठी निवडक अधिकारी, कर्मचारी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन सन्मानित केले जाते. यंदा महाराष्ट्रातील चार पोलिस कर्मचार्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील तब्बल ७४ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाले. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, तर २५ पोलिसांना पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ४५ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्य दिना निममित्त केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक प्रदान करते. २०२१ या वर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये ६३० व सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८० पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
शौर्य पदक श्रेणीत २ राष्ट्रपती पोलीस पदक'(पीपीएमजी), तर ६२८ पोलिसांना पोलीस शौर्य पदक'(पीएमजी) आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला तब्बल ७४ पदक मिळाली आहेत.
शौर्य पदक श्रेणीत २ आणि सेवा पदक श्रेणीत ८८ अशा देशातील एकूण ९० पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.
शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक राष्ट्रपती पोलीस पदक
1. सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर)
सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन राष्ट्रपती पोलीस पदक
1 श्री अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीण.
२ श्री आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबई.
3 श्री विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. यवतमाळ.
शौर्य पदक श्रेणीत राज्यातील एकूण २५ पोलिसांना पोलीस शौर्य पदक
1. लिंगनाथ नानैय्या पोर्टेट, पोलीस हेडकॉन्स्टेबल
2. मोरेश्वर पत्रू वेलाडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
3. बिच्छू पोच्या सिदम, पोलीस कॉन्स्टेबल
4. श्यामसे ताराचंद कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल
5. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल
6. गोवर्धन धनाजी कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त
7. हरी बालाजी एन, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त
8. प्रविण प्रकाशराव कुलसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
9. सडवली शंकर आसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
10. योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरिक्षक
11. सुदर्शन सुरेश काटकर, पोलीस उपनिरिक्षक
12. रोहिदास शिलुजी निकुरे, हेडकॉन्स्टेबल
13. आशिष देवीलाल चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
14. पंकज सीताराम हलामी, पोलीस कॉन्स्टेबल
15. आदित्य रवींद्र मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
16. रामभाऊ मनुजी हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल
17. मोगलशाह जीवन मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
18. ज्ञानेश्वर देवराम गावडे, पोलीस कॉन्स्टेबल
19. राजेंद्र कुमार परमानंद तिवारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक
20. विनायक विठ्ठलराव आटकर, पोलीस कॉन्स्टेबल
21. ओमप्रकाश मनोहर जामनिक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
22. मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अतिरिक्त पोलीस निरिक्षक