एका वस्तीगृहातील ३० विद्यार्थी कोरोनाग्रस्त

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:46 IST)
हिंगणघाट शहरातील एका वस्तीगृहातील ३० विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी एंटीजन तपासणीमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आले.एकाचवेळी वसतीगृहात सुमारे ३० विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्ययंत्रणासुद्धा 'अलर्ट' झाली आहे.  शहरातील एका नामवन्त समाजसेवी संस्थेद्वारा सदर वसतीगृह चालविण्यात येत असून येथील मुले शहरालगतच असलेल्या खाजगी शाळेत शिक्षण घेतात.
 
या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यास कोरोना आजार झाला होता.त्यासाठी  तो खाजगी डॉक्टरांकड़े उपचार घेत होता,त्याचे संपर्कात आल्यानेच इतर विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.एकुण ३९ मुलांची तपासणी केली असता त्यातील १० ते १६ वर्ष वयोगटातील ३० मुले पॉझिटीव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णाळयाचे डॉ.विजय कुनघाडकर यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती