'म्हणून' किरीट सोमय्या यांना अटक

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:44 IST)
कोरलेई जमीन घोटाळ्याप्रकरणी ठाकरे सरकार चौकशी करण्यास तयार नाहीत असे म्हणत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यावरर ठिय्या, धरणा आंदोलन सुरु केले होते. जोपर्यंत यावर ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरून रात्रभर हटणार नाही असा पवित्रा सोमय्यांनी घेतला होता. परंतु अलिबाग पोलिसांनी त्यांना रात्री ८.१५ वाजता अटक केली आहे. यासंदर्भातील माहिती किरीट सोमय्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, कोरलेई जमीन घोटाळा ची चौकशी करायला ठाकरे सरकार तयार  नाही, म्हणून आमचे ठिय्या, धरणा आंदोलन जिलाधिकारी कार्यालय अलिबाग येथे रात्रभर सुरू ठेवायचा निर्धार केला.परंतू आत्ता रात्री 8.15 वाजता पोलिसांनी आमची अटक केली. अलिबाग पोलिस स्टेशनला घेवून जात आहे, असे लिहिले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरलई येथे जमीन घोटाळा केला असा भाजपाचा आरोप आहे. या मुद्द्याला घेऊन आता भाजपा शिवसेनेविरोधात अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर आज अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाने शिवसेनेविरोधात आंदोलन सुरु केले. या आंदोलनात भाजपा नेते किरीट सोमय्या सहभागी झाले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती